Peoples Media Pune header

Go Back

मा. अजितदादा पवार यांना पक्ष व घड्याळ चिन्ह मिळाल्या बद्दल लाडू वाटप.

15 Feb 2024
पुणे (दि.१४) राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना मिळाल्याचा आनंद गाडीतळ चौक मंगळवार पेठ येथे लाडू वाटप करून साजरा करण्यात आला. माजी स्थायी समिती अध्यक्ष व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.सदानंद शेट्टी यांनी याचे आयोजन केले. चौकातील नागरिक, छोटे विक्रेते, रिक्षा ड्रायव्हर व प्रवासी, बस मधील प्रवासी, तसेच दुचाकी स्वार व लहान मुले यांना लाडू वाटप करून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. या प्रसंगी मा.सदानंद शेट्टी, माजी सभागृह नेते दत्ताभाऊ सागरे, दिनेश आरदाळकर, निताताई गायकवाड, मुन्नालाल परदेशी, आशाताई वाघमोडे, जावेद शेख, मुमताज शेख, कौसर खान, मंगेश साखरे, नुरुद्दीन अन्सारी, अशोक चव्हाण, कादर शेख, करीम शेख, उषा गायकवाड, राजूभाई आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना सदानंद शेट्टी यांनी आगामी काळात पक्षाला यशस्वी करण्यासाठी कटीबद्ध होण्याचे सर्वांना आवाहन केले. छायाचित्र : लाडू वाटप करतांना सदानंद शेट्टी व मान्यवर.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite