Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सारसबागकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास २ व्हेंटिलेटर प्रदान.

22 Feb 2024
पुणे (दि.२१) रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबागला नुकताच VEGA या जर्मन कंपनीकडून १० लाख रुपयांचा सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सिबिलीटी फंड) प्राप्त झाला. ह्या सी.एस.आर. अंतर्गत क्लबतर्फे आधुनिक पद्धतीचे २ व्हेंटिलेटर (NIV मशीन्स) दिनानाथ मंगेशकर रुग्णालय येथील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात बसविण्यात आले. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्ष स्नेहल घोडके, सचिव संजय शिंदे, माजी प्रांतपाल पंकज शहा, VEGA कंपनीचे संचालक श्री सुदर्शन श्रीनिवासन, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ.धनंजय केळकर व त्यांचे सहकारी डॉक्टर्स, तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबागचे सर्व सन्मानीय सदस्य उपस्थित होते. छायाचित्र : व्हेंटिलेटर प्रदान प्रसंगी सर्व मान्यवर.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite