Peoples Media Pune header

Go Back

जीवनाला “अर्थ” देणारी पुस्तके.

23 Feb 2024
जीवनाला “अर्थ” देणारी पुस्तके. पुणे (दि.१७) डॉ सुभाष भावे लिखित श्री हनुमान चालीसा विवेचनात्मक विचार या मराठी पुस्तकाचे डॉ धनंजय केसकर यांनी इंग्रजीत भाषांतर केले- “Shri Hanuman Chalisa A Deliberation”प्रकाशक इंडस सोर्स बुक्स. तसेच मेरी बफे व डेव्हिड क्लार्क यांच्या द डाओ ऑफ वॉरेन बफे या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले – “ वॉरन बफे यांचे गुंतवणूक सिद्धांत”प्रकाशक मंजुळ प्रकाशन. या नवीन भाषांतरीत पुस्तकांचे प्रकाशन ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ.गिरीश बापट, व उद्योजक डॉ.सुधीर राशिंगकर यांच्या हस्ते करण्यात आले. रुईया मुकबधीर विद्यालय येथील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी इंडस प्रकाशनाच्या सोनवी देसाई आणि मंजुळ प्रकाशनच्या मेघा कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना अनुवादक डॉ.धनंजय केसकर यांनी हनुमान चालीसा हिंदूंच्या भक्तीचा विषय आहे. हिंदू जगभरात विविध देशात ही आहेत त्यामुळे या पुस्तकाला सर्वत्र प्रतिसाद मिळेल असे सांगितले. छायाचित्र : डावीकडून डॉ.गिरीश बापट,डॉ.सुधीर राशिंगकर,डॉ.धनंजय केसकर,डॉ.सुभाष भावे.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite