Peoples Media Pune header

Go Back

टेलर मास्टर असोसिएशन पुणे महाराष्ट्रचा प्रथम वर्धापन दिन संपन्न.

29 Feb 2024
पुणे (दि.२८) आपल्या सर्वांचे कपडे शिवून आपल्या व्यक्तीमत्व खुलवणारे सर्व जाती धर्मातील टेलर एकत्र येवून टेलर मास्टर असोसिएशन पुणे महाराष्ट्र याची स्थापना केली. याचा प्रथम वर्धापन दिन शिव पार्वती मंगल कार्यालय नऱ्हे रोड येथे उत्साहाने संपन्न झाला. यात उत्तम कामगिरी करणाऱ्या टेलर्स सत्कार, नऊवारी साडीतील रॅम्प वॉक, विविध गुणदर्शन व विविध वस्तूंचे प्रदर्शन याचा सामावेश होता. या कार्यक्रम प्रसंगी टेलर मास्टर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर दोन्हे, उपाध्यक्ष बाप्पुसाहेब वाबळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब चिलमे, सहकार्यवाह संतोष बिराजदार, खजिनदार उत्तम दबडे, सहखजिनदार दिलीप पुरोहित, सचिव संजय शिंदे, सहसचिव दत्तात्रय राऊत, हिशेब तपासनीस नंदकुमार कोळेकर, सदस्या अरुणा कदम, सदस्या नंदा पाटील.सदस्य चंदू तावरे,सदस्य गणेश तुम्मा आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. छायाचित्र : असोसिएशनचे पदाधिकारी व मान्यवर यांचे समूहचित्र.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite