Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब प्राईडच्या वतीने २ महिला शास्त्रज्ञांचा “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार” देवून सन्मान.

09 Mar 2024
पुणे (दि.८) जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब पुणे प्राईडच्या वतीने दोन महिला शास्त्रज्ञांचा “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार”(व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड)प्रदान करून सन्मान करण्यात आला. डॉ.लीलावती नारळीकर (IISER Pune.) व डॉ.मोनाली राहुलकर (आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट). यांना प्रमुख पाहुण्या शीला गोडबोले(Dir ICMR,NARI) यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विनायक इंजिनिअरींग सिस्टिम्स यांना रोटरी मित्र पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व पैठणी साडी असे होते. मराठा चेंबर्सच्या डॉ सुमंत मुळगावकर सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब प्राईडचे अध्यक्ष सुधीर बापट, सचिव शैलेश शिर्सीकर, व्होकेशनल डायरेक्टर हरीश भावे आदी मान्यवरांच्या बरोबरच क्लब सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ.शीला गोडबोले यांनी सर्वच मुले मुली आणि विद्यार्थी या सर्वांच्या मनात शास्त्र – विज्ञान या बाबत कुतूहल हवे,जिज्ञासा हवी असे प्रतिपादन केले. छायाचित्र : डावीकडून हरीश भावे,डॉ.मोनाली राहुलकर,डॉ.शीला गोडबोले,डॉ लीलावती नारळीकर,सुधीर बापट.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite