Peoples Media Pune header

Go Back

सुदर्शना त्रिगुणाईत यांची पुणे शहर महिला सह-संपर्कप्रमुख पदी नियुक्ती.

23 Mar 2024
पुणे (दि.२३) सुदर्शना रमेश त्रिगुणाईत यांची पुणे शहर महिला सह-संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या पुढाकाराने ही नियुक्ती करण्यात आली.शिवसेना आनंद आश्रम टेंभी नाका मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना सचिव संजय मोरे यांनी सुदर्शना त्रिगुणाईत यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.या प्रसंगी प्रवक्ता मनीषा कायंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सुदर्शना त्रिगुणाईत या शिक्षण क्षेत्रांत कार्यरत आहेत. या प्रसंगी बोलतांना नवनियुक्त सह संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत यांनी आगामी काळात महिलांच्या व शैक्षणिक प्रश्नांवर कार्य करणार असल्याचे तसेच या नियुक्तीने महिलांची शक्ती वाढणार असल्याचे नमूद केले. छायाचित्र : १)संजय मोरे नियुक्तीपत्र देतांना,२) सुदर्शना त्रिगुणाईत.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite