पुणे (दि.२४) माणुसकी फौंडेशन, जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन, जनहित बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान अशा १४ महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. उद्यान मंगल कार्यालय सदाशिवपेठ येथे नुकतेच संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष डॉ.राजेंद्र भवाळकर ,डॉ.अनिल माळी, डॉ.सुवर्णा माळी, अॅड.प्रार्थना सदावर्ते, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना डॉ.राजेंद्र भवाळकर यांनी नवदुर्गांनी आता चंडिका बनायला हवे, सध्या महिला असुरक्षित झाल्या आहेत, प्रथितयश महिलांनी याबाबत जनजागृती केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
छायाचित्र : सत्कारार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र.