स्नो पँथर्स पिंपरी चिंचवड शाखेचे उद्घाटन संस्थापक डॉ.दीपक तोष्णीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. डेप्युटी मेयरपदी भूपेंद्रसिंग यांची निवड करण्यात आली, अध्यक्षपदी नवीन पाटणकर यांची तर उपाध्यक्षपदी सुधीर मंडल यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी सुमित गोकर्ण यांनी पदभार स्विकारला. सेव्हन अॅपल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी कोविड काळात एकमेकांना मदत करण्यासाठी निर्माण झालेल्या उद्योजकांच्या या संस्थेत आता २४ देशांतील सुमारे २६०० उद्योजक सहभागी झाले असून ते एकमेकांशी स्पर्धा करण्या ऐवजी परस्पर सहकार्य करून आपला उद्योग व्यवसाय वाढवीत आहेत असे सांगितले.
छायाचित्र : पदाधिकारी व सदस्य यांचे समूहचित्र.
© 2011. Peoples Media Pune