Peoples Media Pune header

Go Back

सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल पालक संघटनेचे फी वाढी विरोधात खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांना निवेदन

Pune 08 Apr 2011 पिपल्स मीडीया पुणे

सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या फीवाढी संदर्भात अन्यायकारक व पिळवणूक करणा-या निर्णयाविरूध्द पालकानीं आंदोलनाचा पवित्रा घेतला असून; त्या अंतर्गत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना निवेदने देण्यात येत असून शैक्षणिक सेवाकार्यात विशेष आवड असलेल्या खा. सौ.सुप्रियाताई सुळे यांची निसर्ग मंगल कार्यालय, मार्केटयार्ड येथे संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.

याप्रसंगी शिवाभाऊ पासलकर, नील गोलाईत, संदीप देव, गजेंद्र सुतार, प्रशांत जोग, अनिल महाजन, मनिष श्रीवास्तव आदी पदाधिकारी उपस्थित होते. खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांनी याविषयी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल असे शिष्टमंडळास सांगितले.

शिवाभाऊ पासलकर
(सिंहगड स्पिंगडेल स्कूल पालक संघटना)

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite