Peoples Media Pune header

Go Back

’सोशल मिडियाचा मार्केटिंगसाठी उपयोग’ या विषयावर प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांची कार्यशाळा

Pune 18 Jul 2011 Sonar

सोशल मिडिया मार्केटिंगसंबंधी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन प्रख्यात आय.टी. कन्सल्टंट व ट्रेनर  प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांनी केले आहे.  श्री झवेरी हे गेली ३५ वर्षे आय.टी. क्षेत्रात कार्यरत असून ई.आर.पी (Enterprise Resource Planning) या पुस्तकाचे ते लेखक आहेत. आय.बी.एम. मध्ये ते १९७५ साली कार्यरत होते. हे प्रशिक्षण शिबीर रॉयल बोट क्लब बंडगार्डन रोड पुणे येथे बुधवार दिनांक २० जुलै २०११ रोजी दुपारी २ ते ६ या वेळात होईल.  या शिबीरामध्ये प्रो. ज्योतिंद्र झवेरी हे प्रशिक्षार्थींना ट्विटर, यू ट्युब, फेसबुक, लिंकडइन, ब्लॉग या नेटवर्किंग साईटच्या सहाय्याने  मार्केटिंग कसे करावे याची माहिती देतील.
जाहिरात, होर्डिंग, टीव्ही या पारंपारीक मार्गाने सध्याही जाहिरात केल्या जातात.  मात्र त्या किती लोकांनी पाहिल्या यांची निश्चित संख्या कळू शकत नाही. सोशल मिडियात आपण केलेली जाहिरात किती लोकांनी पाहिली याचा रिपोर्ट मिळतो (इनसाईट वेब ऍनालिटीक), महत्वाचे म्हणजे या सर्व वेबसाईट फ्री आहेत.  म्हणजेच खर्च जवळ जवळ नाहीच.  आणि याला भौगोलिक मर्यादाही नाहीत.
सेल्स व मार्केटिंगमधील लोक, व्यावसायिक व विद्यार्थी यांना या तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी या वर्गाचे आयोजन केल्याचे प्रो. झवेरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  इच्छुकांनी संपर्क  socialmedia@dnserp.com, www.dnserp.com , Mo 91-9422338019

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite