’साहित्य कलायात्री’ तर्फे देण्यात येणारा यंदाचा ’समाजरत्न’ जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष ट्रस्ट (महा.राज्य) हवेली तालुका, उपाध्यक्ष मा. दिलीप भाडळे, संस्कार फाउंडेशनचे आळंदी अध्यक्ष, मा. वैकुंठ कुंभार व सिध्दिविनायक प्रतिष्ठान मुंढवा, केशवनगर अध्यक्ष मा. रामभाऊ खोमणे यांना जाहीर झाल्याची माहिती साहित्य कलायात्रीच्या अध्यक्षा नम्रता लोणकर व उपाध्यक्ष संदिप जाधव यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
मानपत्र, मानचिन्ह, शाल, हार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार वितरण सोहळा ११ एप्रिल वार सोमवार रोजी,दु. १२.३० वा. बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्यॆष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून पुरस्काराचे वितरण पुण्यनगरीचे महापौर मा. मोहनसिंग राजपाल व बारामती मित्र मंडळाच्या अध्यक्षा मा. शर्मिलाताई पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार प्रकाश देवळे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमा दरम्यान निमंत्रितांचे कवी संमेलन करण्याचे आयोजिले आहे तसेच प्रा. दत्ताजीराव थोरात लिखित ’अंधारातले उजेडात’ (कथासंग्रह) व ’काव्य-कण’ (चिंतनिका), दत्तात्रय भिसे ’दुभंगलेली मन’ (कादंबरी), रामभाऊ कणसे ’मृगजळ’ (कादंबरी), जयवंत हानप ’नक्षत्रांची पहाट’ (चारोळी संग्रह), जालिंदर यादव ’सुमित्रा’ (काव्यसंग्रह) व ज्येष्ठ कवी सुभाष पवार यांच्या ’कविता वनातल्या हिरव्या मनातल्या’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व लेखक डॉ. आनंद यादव यांच्या हस्ते होणार आहे.
© 2011. Peoples Media Pune