Peoples Media Pune header

Go Back

सौरउर्जेवर उत्पादकांचे चर्चासत्र

पुणे 11 Apr 2011 पिपल्स मीडीया पुणे

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने सौरउर्जेवर श्रमिक पत्रकार संघ, गांजवे चौक येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चाप्रसंगी के.व्ही.राव (जनरल मॅनेजर नाबार्ड), एच.एम.कुलकर्णी (मेडा), मंगल अकोले (अध्यक्ष, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), सुशिल पुंगलिया (माजी अध्यक्ष), सुहास घोटीकर (माजी अध्यक्ष), संजय देशमुख (सेक्रेटरी), एन.पी.जोशी आदी मान्यवरांबरोबरच विविध सौर उत्पादने निर्मिती करणारे उद्योजम उपस्थित होते.

के.व्ही.राव यांनी मार्गदर्शन करताना नाबार्डच्या विविध योजनांची व कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली. एच.एम.कुलकर्णी यांनी सौरउर्जा, पवनउर्जा क्षेत्रात मेडा करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच
सर्व महानगरपालिकांनी सौर उर्जा वापरणे बंधनकारक करण्याचा ठराव केला असून त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही अशी खंत व्यक्त केली, मंगल अकोले यांनी आपल्या प्रास्ताविकात असोसिएशनची माहिती दिली व आगामी काळात देश पातळीवर कार्यशाळेचे आयोजन करण्याची योजना असल्याचे सांगितले. सुशिल पुंगलिया यांनी सौरउर्जा ही कांही काळापूर्वी एक संकल्पनाच होती. गरज बनली आहे असे प्रतिपादन केले.प्रकाशन करण्यात आले. सध्या मात्र ती वास्तव या कार्यक्रमात असोसिएशनच्या दैनंदिनीचे मान्यवरांचे ह्स्ते सुहास घोटीकर यांनी आभार प्रदर्शन केले.

 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite