मातृ - प्रबोधन संस्था ,निगडी पुणे यांचा आदर्श माता पुरस्कार सौ वसुधा गिरिधारी यांना नुकताच जाहीर झाला आहे.त्यांचे सुविद्य चि. विवेक गिरिधारी यांना ज्ञान प्रबोधिनीच्या पूर्णवेळ ग्रामीण विकसनाच्या कामाला त्यांनी १९९० साला पासून मोकळीक दिली .स्वतः एम.ए. एम.एड.असून घर सांभाळले .काटकसरीने संसार सांभाळला .मुलांना सुसंस्कारित शिक्षण दिले. मुलाच्या सामाजिक . आदिवासी भागातील कार्याला सदा उत्तेजनच दिले.यासाठी दि.१६ जुलै ला निगडी येथे रु.२०००/-चा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान होत आहे.
विवाहानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून पदवी नंतरचे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे वडील डॉ.मो.गं.गायधनी यांचा सामाजिक आणि काका डॉ.राजाभाऊ गायधनी यांचा रा.स्व.संघ कार्याचा वारसा जपला. चि.विवेकला अगदी लहान असल्यापासून संघात स्वतः नेत असे.त्याचा ठसा विवेकवर पक्का बिंबला. १९७४ सालची बी.एड.संस्कृत मेथड, नौकरी घर चालत आली,तरी विवेक ९ वित,प्राचार्य म्हणून डॉ. गिरिधारी ९ वर्षे जव्हारला ,त्या मुळे गरज असूनही नौकरी केलीच नाही. नंतर विवेक बी.ई.,विदुला एम.सी.म.,विश्वजित बी.सी.जे.,सी.डेयाक .झाल्यावर मुंबईच्या पार्ले टिळक, राजाशिवाजी ,आर.एम.भट,सारख्या प्रसिद्ध शाळेत संस्कृत शिकविले.नीलकांत नावाच्या दलित उमेदवाराला नौकरी मिळावी म्हणून हक्क असूनही मुलाखतीला सौ. वसुधाताई गैरहजर राहिल्या.
सामाजिक दृष्ट्या हा मोठा त्याग आहे.
विवेक बी.ई., असूनही त्याला अत्यंत खडतर अश्या ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील कार्याला उत्तेजन दिले.त्याच्या बरोबरच्या मोठे पगार कमावणाऱ्या ,विदेशात जाणाऱ्या मित्रांशी कधी तुलनाही केली नाही.उलट आपली मुलासाठी होणारी जीवाची घालमेल दडवून
ठेवली.त्याची अहोरात्र काळजी वाहिली, पण त्याला सदा आनंदी ठेवले.खरतर ही मातृहृदयाची कसोटी होती.
© 2011. Peoples Media Pune