पुणे (दि.२१) “साडेपांच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण यांनी महाभारत युद्ध स्थळावर अर्जुनाला गीतेद्वारे उपदेश केला,यातील मार्गदर्शन हे त्या काळापुरते नसून आजच्या काळात सुद्धा तितकेच लागू आहे. यात भगवान श्री कृष्णाने योग्य सात्विक आहार, विहार,विचार याचे मनुष्याने पालन करावे याने आयुष्य, आरोग्य, जीवन व आनंद यात वाढ होते. मात्र सर्व प्रकारची व्यसने ही आरोग्य व आयुष्य यांचा नाशच करतात, त्यापासून सर्वांनीच दूर राहावे असे सांगितले.” विश्व जागृती मिशन पुणे मंडल आयोजित तीन दिवसीय सत्संग सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते.रहाटणी येथील थोपटे बँक्वेट सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विश्व जागृती मिशन पुणे मंडल अध्यक्ष घनश्याम झंवर,महामंत्री विष्णू भगवान अग्रवाल,उपाध्यक्ष गणेश कामठे आदी मान्यवरांच्या बरोबरच मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र : प.पु सुधांशुजी महाराज मार्गदर्शन करतांना.