पुणे (दि.२३) “जग हे परमेश्वराने प्रेमाने बनविलेले विश्व आहे,यात परमेश्वर आपल्या प्रेमाने विविध रंग भरतो.त्याच प्रमाणे गुरु सुद्धा शिष्यांच्या जीवनात विविध प्रेमाचे रंग भरतो. त्यामुळे जीवनाला अर्थ प्राप्त होवून जीवन आनंदी व सुखी समाधानी बनते. देवाचे प्रेम हे बंधनात नसते तर मुक्ततेत असते,आपण पक्षी पिंजर्यात ठेवून त्यावर प्रेम करतो ते राक्षसी प्रेम, मात्र मुक्त असलेला पक्षी हे देवाचे प्रेम असते. असे प्रतिपादन प.पु.सुधांशुजी महाराज यांनी केले.विश्व जागृती मिशन पुणे मंडल आयोजित तीन दिवसीय भक्ती सत्संग महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. थोपटे लॉन रहाटणी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विश्व जागृती मिशन पुणे मंडलचे अध्यक्ष घनश्याम झंवर, महामंत्री विष्णू भगवान अग्रवाल, उपाध्यक्ष गणेश कामठे, आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
छायाचित्र : प.पु सुधांशुजी महाराज व मान्यवर.