Peoples Media Pune header

Go Back

अंबिलओढा विभाग रेशनींग कार्यालयावर शिवसेनेतर्फे निदर्शने.

पुणे 06 May 2011 peoplesmediapune

परिमंडळ कार्यालय ’ह’ विभाग, अंबिलओढा येथे सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीतील दुरावस्था व रेशनींग कार्ड मिळणे व अन्य नागरीक समस्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपनेत्या, जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. नीलमताई गो-हे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.  तसेच परिमंड्ळ अधिकारी आशा होळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  यामध्ये रेशनकार्ड मिळण्यास नागरिकांना होणारा त्रास, रेशन दुकानात वस्तू न मिळणे, अन्नधान्य वितरन कार्यालयात होणारा गैरव्यवहार, रेशनींग कार्ड  मिळविण्यात एजंतांचा सुळसुळाट व अन्य बेकायदेशीर गोष्टींचा समावेश होता.  त्यावेळी झालेल्या चर्चेत दक्षता कमिटीमध्ये नगरसेवकांचा समावेश, रेशनींग दुकान बोर्डावर माहिती नसल्यास त्याचे फोटो काढणे व १८ वर्षावरील मुलांचे नांव रेशनकार्डात वाढवून युनिट वाढवून मिळण्यासाठी नोंदणी मोहिम शिवसेनेच्या मदतीने राबविणे व गोष्टी ठरविण्यात आल्या.

या आंदोलनाप्रसंगी नीलमताई गो-हे, नाना वाडेकर (शहर प्रमुख), गणेश सातपुते (उपनेते), राजेंद्र शिंदे (उपशहर प्रमुख), अशोक हरणावळ (नगरसेवक), दिपक गावडे ( नगरसेवक), श्रीकांत पुजारी (नगरसेवक), राधिकाताई हरिश्चंद्रे (महिला आघाडी), विभाग प्रमुख - भरत कुंभारकर, बाळा ओसवाल, हुजुर इनामदार, किशोर विटेकर (उपशहर प्रमुख), महेश महाले (विद्यार्थी सेना), संतोष गोपाळ (विद्यार्थी सेना), मकरंद पेठकर, महेश मते, सुरज लोखंडे, अनंत घरत, गणेश हनमघर, योगेश पवार, अनिल बटाणे, चित्रा साठे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांनी अनागोंदी कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

 

 

 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite